। अलिबाग । वार्ताहर ।
कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अलिबाग या संस्थेच्या नवीन अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड मंगळवारी (दि.16) संस्थेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात अध्यासी अधिकारी श्रीकांत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
संस्थेचे पुर्वाश्रमीचे अध्यक्ष सतीशचंद्र पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी ही निवडणूक घेण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार चाळके व सचिवा गीतांजली ओक यांनीही उपाध्यक्षपदाचा तसेच सचिवपदाचा राजीनामा दिला होता. त्या पदाचीही निवडणूक घेण्यात आली. त्यानुसार संस्थेचे अध्यक्ष म्हणून नंदकुमार महादेव चाळके यांची तसेच, उपाध्यक्ष म्हणून मोरेश्वर दातार यांची एकमताने निवड करण्यात आली. उपविधीच्या तरतुदीनुसार रिक्त सचिवपदी व्यवस्थापनाने एकमताने लक्ष्मण जुंधारे यांची नियुक्ती करण्यात आली.