चंपाई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री

बहुमत सिद्ध करण्यासाठी 10 दिवसांचा वेळ

| झारखंड | वृत्तसंस्था |

झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष चंपाई सोरेन यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शुक्रवारी शपथ घेतली. जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने झारखंडचे हेमंत सोरेन यांना अटक केली. त्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी शुक्रवारी चंपई सोरेनयांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. याशिवाय काँग्रेस पक्षाचे आलमगीर आलम आणि आरजेडीचे सत्यानंद भोक्ता यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी यांनी चंपई सोरेन यांना बहुमत सिद्ध कऱण्यासाठी दहा दिवसांचा वेळ दिला आहे. झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाची युती आहे. झारखंड मोर्चाकडे 29 तर काँग्रेसकडे 17 आमदार आहेत. त्याशिवाय आरजेडीच्या एका आमदाराचाहीपाठिंबा आहे. झारखंडमधील बहुमताचा आकडा 41 इतका आहे. त्यामुळे बहुमत सिद्ध होत नाही, तोपर्यंत आमदारांना हैदराबादमधील हॉटेलला पाठवण्यात येणार आहे.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी चंपाई सोरेन यांनी शिबू सोरेन यांची भेट घेतली होती. यानंतर चंपाई म्हणाले की गुरुजी आमचे आदर्श आहेत, शपथ घेण्यापूर्वी आम्ही गुरुजी आणि माताजी यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. मी झारखंड चळवळीशी निगडीत होतो आणि मी त्यांचा शिष्य आहे.

Exit mobile version