चॅम्पियन्स कराटे क्लब विजयी

| महाड । वार्ताहर ।

पुणे धायरी इथे चॅम्पियन्स कप आमंत्रित राष्ट्रीय कराटे स्पर्धा नुकतीच पार पडली या स्पर्धेत चॅम्पियन्स कराटे क्लब महाडच्या 51 खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यात 26 सुवर्ण 16 रौप्य आणि 19 कांस्यपदके अशी एकूण 61 पदकांची कमाई केली. 14 वर्षाखालील मुलींमध्ये श्रावणी कोंडविलकर हिने कुमिते आणि काता या दोन्ही प्रकारांमध्ये चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ट्रॉफी आणि स्कॉलरशिप प्राप्त केली. 17 वर्षाखालील मुलांमध्ये शिलदीप गायकवाड यानी कुमीते या प्रकारात चॅम्पियन ट्रॉफी आणि स्कॉलरशिप प्राप्त केली.

सीनियर कॅटेगिरी मुलींमध्ये तेजस्वी वाळंज हिने कुमिते या प्रकारात चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ट्रॉफी आणि स्कॉलरशिप प्राप्त केली. खुशी वर्तक, दक्षिल शेठ, श्रावणी कोंडविलकर, अभिनील राजभोज, विहान कदम, काव्य कदम, समीक्षा पाटील, यश साळवी, ओम सावंत, दुर्वेश थरवळ, मोहित विश्‍वकर्मा, तृप्ती खरडेकर, कृष्णा चव्हाण, शिलदीप गायकवाड, तेजस्वी वाळंज यांनी सुवर्णपदके प्राप्त केली. अनय बोरसे तेहजीब बाली किमया कुंटे, दक्षिल शेठ, आरव शिंदे, जिजा जोशी, पारस पाटील, आर्यन मोरे, यश तासगावकर, प्रांजल पवार, आराध्या कांबळे, वेदस्व पवार यांना रौप्य पदके प्राप्त केली.राणू मंडल, सुरज पवार गतीक चव्हाण, नील शेठ नैतिक शेडगे, वैष्णवी गोडबोले, स्वराज साळवी, स्वरा गोंधळी, चिन्मय पाटील, अर्णव कांबळे यांना कांस्य पदक प्राप्त केले.

Exit mobile version