। रसायनी । वार्ताहर ।
राष्ट्रीय महामार्ग क्र.4 म्हणजे जुना मुंबई-पुणे रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत वाढल्यामुळे अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही. हा रस्ता चार पदरी असल्याने गावात, हॉटेल किंवा पेट्रोल पंप या ठिकाणी जाण्यासाठी असलेला मार्ग विशेषतः हॉटेल व पंप येथे जाणारा मार्ग बंद केला आहे. या रस्त्यावर असलेल्या नढाळ, वावंढळवाडी, दांडवाडी येथे दुभाजकमध्ये अंतरही नाही, वावंढळवाडी येथे भयानक परिस्थिती आहे. पनवेलकडून येताना नढाळ गावात शिरताना समोरच वडाचे मोठे झाड आहे,तसेच वाढलेले गवत यामुळे खोपोली कडून पनवेलकडे जाणार्या गाड्या दिसत नाहीत,तसेच खोपोलीकडे उतार असल्याने पनवेलच्या दिशेकडे पहाताना अवघड होतं आहे. सद्या पडणारा पाऊस व वार्याने हे गवत रस्त्यावर पडत आहे त्याचीही भीती आहे.