राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता

| मुंबई | प्रतिनिधी |
पुढील तीन दिवस महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 5 ते 8 मार्च दरम्यान ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 7 मार्च रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होईल. शिवाय आज देखील नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगावात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. औरंगाबाद, जालना आणि अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी आज पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भात अकोला, बुलढाणा आणि जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Exit mobile version