दोन दिवस पावसाची शक्यता

मुंबई | प्रतिनिधी |
पुढील 2 दिवस महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात परवापासून पावसाचा जोर कमी होणार असून विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर कोकणात प्रमुख्याने पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल. त्यामुळे पालघरसाठी प्रशासनाने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मागील आठवड्यातच मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झालं आहे.
विदर्भासाठी सर्वत्र आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोलीत मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोलीला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातही मुसळधार कोसळू शकतो. प्रामुख्याने नाशिकमधील घाट माथ्यावर मुसळधार पावसाच्या सरींचा अंदाज आहे. इकडे पुणे, सातारा, कोल्हापूर, नंदुरबार, धुळे, जळगावसाठी यलो अलर्ट तर नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

Exit mobile version