| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यामध्ये येत्या पुढील तीन ते चार तासांमध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, विजांचा कडकडाट होणार असून काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी काळजीपुर्वक घरातून बाहेर पडा असे आवाहन रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.