भारतीय हवामान खात्याचा अंदाज
अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात येत्या चार तासामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या सरी तर काही भागांमध्ये वादळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी विनाकारण घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
तापमानात वाढ होत असल्याने जिल्ह्यात उन्हाचे चटके दिवसेंदिवस वाढत आहेत. उन्हाच्या कडाक्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, येत्या तीन ते चार तासामध्ये अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या कालावधीत रायगडसह रत्नागिरी जिल्ह्यात पावसाबरोबरच मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तविली आहे.