। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पालीतील रहिवाशी व रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यामंदिर पोलादपूर येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत असणारे चंद्रशेखर रघुनाथ मोकल यांना शैक्षणिक दीपस्तंभ संस्थेतर्फे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.तंत्रस्नेही व नवोपक्रमशील शिक्षक मोकल रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमध्ये गेली 17 वर्षे काम करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी सदैव काम करत आहेत. डिजिटल आणि ज्ञानरचनावादी शिक्षण देत असताना कोविड काळात विविध माध्यमातून ऑनलाईन अध्यापनाचे कार्य अखंडित करत आहेत.मोकल यांना पुरस्कार मिळाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागाचे अध्यक्ष शिक्षक आमदार बाळाराम पाटील,आर पी ठाकूर, एस एस फडतरे, निवास शेठ, एच आर जाधव, पी बी मंडले, सर्व सेवक वृंद, शैक्षणिक दीपस्तंभाचे सुदाम साळुंके यांनी यांचे अभिनंदन केले.







