। उरण । वार्ताहर ।
पंचायत समितीचे कर्मचारी चंद्रशेखर हिराचंद पाटील उर्फ राकाशेठ यांचे रविवारी (दि.26) दुचाकीवर प्रवास करीत असताना पिरकोन गावच्या वळणावर अपघाती निधन झाले. मृत्य समयी त्यांचे वय 49 वर्ष असुन त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, पत्नी, भाऊ आणि आई असा परिवार आहे. नुकतीच त्यांची उरण पंचायत समिती येथून पनवेल पंचायत समितीमध्ये बदली झाली होती. त्यांच्या निधनाबद्दल सारडे गावासह परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.





