| अलिबाग | प्रतिनिधी |
दागिन्यांच्या क्षेत्रात दोनशे वर्षांची समृद्ध परंपरा जपणारे चंदुकाका सराफ ज्वेलर्स अलिबागकरांच्या आग्रहास्तव, सौंदर्य आणि सर्वोत्तम सेवेचा नवा अनुभव घेऊन भव्य स्वरूपात सादर झाले आहेत. चंदुकाका सराफ ज्वेलर्सच्या 25व्या अलिबाग सुवर्णदालनाचा शुभारंभ सोहळा रविवारी (दि. 18) सकाळी 10:30 वाजता अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, नगरसेवक अंकित बंगेरा, चंदुकाका सराफ ज्वेलर्सचे संचालक आदित्य शहा, संचालक साहस बागी व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना चंदुकाका सराफ ज्वेलर्सचे संचालक आदित्य शहा म्हणाले की, वारसा, निष्ठा आणि परंपरा जपत, 200 वर्षांच्या समृद्ध वारशात दिमाखदार पदार्पण करणारी विश्वासाची सुवर्णपेढी म्हणजे चंदुकाका सराफ ज्वेलर्स. अलिबागच्या सौंदर्यात अधिक भर घालण्यासाठी, चंदुकाका सराफ ज्वेलर्स आता आपल्या भेटीला आले आहे. आता अलिबागकरांसाठी सोनं, चांदी आणि हिऱ्यांच्या आकर्षक, पारंपरिक तसेच आधुनिक डिझाइन्सचा विशेष सुवर्णसंग्रह नव्या शोरूममध्ये एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.
या शुभारंभानिमित्त अलिबागकरांसाठी खास आकर्षक ऑफर्स सादर करण्यात आल्या आहेत. सोन्याच्या दागिन्यांवर प्रति ग्रॅम केवळ 3.99 टक्के ते 9.99 टक्के मजुरी, हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100 टक्केपर्यंत सूट, तसेच चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 30 टक्के सूट मिळणार आहे. या विशेष ऑफर्स 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2026 या कालावधीत लागू राहतील.
अलिबागमधील चेंढरे येथे सुरू होणारे हे नवीन शोरूम ग्राहकांना आधुनिक सुविधा, उत्कृष्ट सेवा आणि दर्जेदार दागिन्यांच्या विस्तृत संग्रहासह खरेदीचा अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी सज्ज झाले आहे. शुभारंभानिमित्त सादर केलेल्या ऑफर्सचा सर्व अलिबागवासीयांनी लाभ घ्यावा असे आवाहन चंदुकाका सराफ ज्वेलर्स यांचेवतीने संचालक अतुल शहा, सिध्दार्थ शहा, आदित्य शहा यांनी केले आहे.
चंदुकाका सराफ ज्वेलर्स सुवर्णदालन अलिबागवासीयांच्या सेवेत दाखल
