। म्हसळा । वार्ताहर ।
न्यू इंग्लिश स्कूल, अंजुमन हायस्कूलमध्ये वाशी हवेली, मजगाव, कांदळवाडा, निगडी, पाभरे या गावांतून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी म्हसळा येथे येतात. गोरगरीब आणि शेतकर्यांच्या मुलांना प्रवासासाठी एसटी हाच एकमेव पर्याय आहे. परंतु एसटीच्या फेर्यांचा वेळ हा शाळेच्या वेळेनुसार नसल्याने त्यांची फार मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. काही विद्यार्थी व पालकांनी त्वरित श्रीवर्धन बस आगाराच्या प्रमुख महिबूब मनेर यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या गैरसोईबद्दल चर्चा करून बसच्या वेळेत बदल करण्याबाबत विनंती केली. आगार प्रमुख मनेर यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आणि बसच्या वेळेत बदल करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केली. नवीन वेळेनुसार बसच्या फेर्या सुरु करण्यात आल्या. सकाळी 11. 15 वा. सुटणारी बस आता सकाळी 10 वाजता सुटेल.