सीम कार्ड घेण्यासाठीचे बदलले नियम

। नवीदिल्ली । वृत्तसंस्था ।
नवे सिमकार्ड घेण्यासाठीच्या नियमांमध्ये केंद्र सरकारने बदल केला असून काही नियम अधिक कडक केले आहेत. नव्या नियमांनुसार जर एखाद्या नागरिकाला नवे सिमकार्ड विकत घ्यायचे असेल किंवा एखादा नंबर प्रिपेडवरून पोस्टपेड करायचा असेल किंवा पोस्टपेडवरून प्रिपेड करायचा असेल तर आता कुठल्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. प्रत्येक नागरिकाचा डिजिटल केवायसी हाच त्यासाठी गृहित धरला जाणार आहे. प्रत्येक टेलिकॉम कंपनीच्या ऍपवर यासाठीचा पर्याय उपलब्ध असेल. त्यावर जाऊन ग्राहकांना केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यासाठी नागरिकांना केवळ 1 रुपया शुल्क भरावे लागेल.

Exit mobile version