पीएनबीच्या सेवा शुल्कात बदल

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पंजाब नॅशनल बँकेने विविध सेवा शुल्कात बदल केले आहेत. सर्वसाधारण बँकिंग व्यवहारासाठी नव्याने सुधारीत दर लागू करण्यात आलेले आहेत. नवीन बदल 15 जानेवारी 2022 पासून अंमलात आणले जातील. पीएनबीने नवीन बदलांबाबतचे पत्रक नुकतेच जाहीर केले आहे.

किमान बॅलन्स आवश्यकता आणि खात्यात किमान बॅलन्स मर्यादेचे उल्लांघन केल्यास दंडाचा भुर्दंड सहन करावा लागू शकतो. ग्रामीण भागासाठी अशाप्रकारच्या शुल्कांत 5,000 रुपयांपासून 10,000 हजारांत वाढ करण्यात आली आहे.खाते उघडल्यानंतर 14 दिवसांच्या आत खाते बंद केल्यास आकारण्यात येणार्‍या शुल्क संरचनेत बदल करण्यात आला आहे. पूर्वी 800 रुपये शुल्क आकारले जात होते. नवीन संरचनेनुसार 600 रुपयांची आकारणी केली जाईल.

12 महिन्यानंतर खाते बंद केल्यास कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.डिमांड ड्राफ्ट, अन्य साधने वैधता, रद्दीकरण शुल्क, गहाळ कागदपत्रे जारी करणे, ड्युप्लिकेट ड्राफ्ट जारी करण्याच्या शुल्कांत फेररचना करण्यात आली आहे. नवी दरानुसार 100 रुपयांऐवजी 150 रुपये आकारले जातील.लॉकर, सुरक्षित कस्टडी साठी वार्षिक भाडे शुल्कात ग्रामीण तसेच शहरी,मेट्रोसाठी वाढ करण्यात आली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागाची लोकसंख्येनुसार वर्गवारी करण्यात आली आहे. बँकेच्या वेबसाईटवर ग्राहकांना दर संरचनेची विस्तृत माहिती वाचायला मिळेल

Exit mobile version