| पनवेल | वार्ताहर |
अमली पदार्थ विरोधी पथकाने खारघर परिसरात कारवाई करून 55 लाख 68 हजारांचे किमतीचे चरस हस्तगत केले आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली असून त्यांच्यावर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोघेही चेंबूर परिसरात राहणारे असून त्यांच्याकडून इतरांची माहिती उघड होण्याची शक्यता आहे. पनवेल शिळफाटा मार्गावर अमली पदार्थ तस्करी होत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वपोनि नीरज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नीलेश धुमाळ, हवालदार गणेश पवार, अंकुश म्हात्रे, संजय फुलकर, जयकुमार पाटील आदींचे पथक केले होते. या पथकाने पापडीचा पाडा गावालगत पोहोचले असता दोघांना ताब्यात घेतले असता 55 लाख 68 हजार रुपयाचे चरस आढळले. गुन्हे शाखा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करून विक्रीसाठी आणलेले चरस जप्त केले आहे.