मनसे नेत्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल

जेएसडब्ल्यू अधिकाय्राकडे दहा लाखांच्या खंडणीची मागणी
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी|
भारत सरकारच्या नावाची खोटी गाडी वापरून व शासकीय अधिकारी असल्याचे भासवून पेण तालुक्याअधिकाऱ्याकडेतील डोलवी येथील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करुन दहा लाख रुपये ची खंडणी मागणी करणाऱ्या चौघां विरोधात वडखळ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, डोलवी येथील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या धरमतर रोड येथील कार्यालयात गुरुवारी सकाळी गणेश पोळ, रा. चेंबूर-मुंबई, जीवन महापुरे, रा. राजाराम पुरी, कोल्हापूर, महेंद्र बनसोडे रा. डेरवली, पनवेल यांनी आपण केंद्र शासनाचे शासकीय अधिकारी असून यावेळी त्यांच्या बरोबर असणाऱ्या मुरलीधर पाटील, रा. बहिरीचा पाडा, यांनी अलिबाग धरमतर-मानकुळे खाडीत बेकायदेशीर सुरु असलेला व्यवहार बंद करण्या संदर्भात सकाळी भारतीय राजमुद्रा असलेल्या लेटर पॅड वर अर्ज दिला होता. या बाबत विचारणा करण्यासाठी ही चौकडी सायंकाळी पुन्हा कंपनीच्या कार्यालयात येऊन दिलेल्या अर्जावर काय भूमिका घेतलीत अशी विचारणा करुन कंपनीतील पीआरओ डिपार्टमेंट मधील असिस्टंट मॅनेजर मंगेशकुमार थत्ते यांना शिवीगाळ करून हे प्रकरण मिटवायचे असेल तर दहा लाख रुपये दे नाहीतर आताच तुला मारून धरमतर खाडीत टाकतो, तुझी कंपनी बंद करतो अशी धमकी दिली.

याबाबत मंगेशकुमार थत्ते यांनी कंपनीचे सिक्युरिटी अधिकारी मंगेश नायगम व सुरेश कुमार यांच्या सोबत याबाबत वडखळ पोलिसांत तक्रार दाखल केली. वडखळ पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते भारत सरकारच्या नावाची बनावट पाटी असलेली क्वालिस गाडी तसेच बनावट लेटर हेड सह ताब्यात घेतले असता हे कोणतेही शासकीय अधिकारी नसल्याचे आढळून आले. त्यांच्या वर वडखळ पोलीस ठाण्यात भा द वि कलम 387, 385, 170, 473, 504, 506, 420 व 34 अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. कोर्टासमोर हजर केल्यानंतर त्यांना 21 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. वडखळ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version