| माणगाव | प्रतिनिधी |
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात आग्रेसर असणाऱ्या माणगाव चारिझेन फाउंडेशनतर्फे तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा बामणोली येथील विद्यार्थ्यांना मंगळवारी (दि.7) दप्तरे वाटप करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.
चारिझेन फाउंडेशन हे रायगड जिल्ह्यात बहुजन समाजात सामाजिक बांधिलकी ठेऊन आपण समाजाचे काहीतरी देणेकरी लागतो, हा उदात्त हेतू नजरेसमोर ठेऊन सातत्याने सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवित आहेत. माणगाव तालुक्यात या फाउंडेशनमार्फत महिलांसाठी शिलाई कोर्स, विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप, टिशर्ट वाटप, रक्तदान शिबीर असे विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत.
आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भावी नागरिक असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फाऊंडेशन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन निर्मलसिंग रंधावा यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले. हे फाउंडेशन बहुजन समाजात सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून निस्वार्थीपणे आपले कार्य करीत आहे. तालुक्यातील बामणोली येथील राजिप शाळेच्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे दप्तरे फाऊंडेशनने देऊन या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला.
चारिझेन फाउंडेशनतर्फे दप्तरे वाटप
