चौल केंद्रात रायगड प्रज्ञा शोध परीक्षा

| चौल | प्रतिनिधी |

चौल केंद्र शाळेत रायगड टॅलेंट सर्च परीक्षा शनिवार, दि. 3 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयारी करुन घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

शिष्यवृत्ती परीक्षेची भीती विद्यार्थ्यांच्या मनातून दूर व्हावी व शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव व्हावा, या उद्देशाने चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी रायगड जिल्हा परिषदेमार्फत परीक्षा घेण्याचे सूचित करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी चौल व नागाव केंद्रातून 39 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. वर्षभरात अशा सहा परीक्षा घेण्यात येणार असून, दोन परीक्षा अभ्यासक्रमावर घेण्यात येणार आहेत.

या परीक्षेच्या नियोजनासंदर्भात चौल केंद्राचे केंद्रप्रमुख रवींद्र थळे यांचे मार्गदर्शन लाभले. पर्यवेक्षक म्हणून रमेश ठाकूर, प्रभाकर धसाडे, राजेंद्र पाटील व हर्षदा म्हात्रे यांनी काम पाहिले. केंद्र संचालक म्हणून मनिषा रवींद्र नाईक यांनी काम पाहिले. परीक्षेचे कामकाज यशस्वी करण्यासाठी चौल व नागाव केंद्रातील शिक्षकांचे महत्त्वाचे योगदान लाभले.

Exit mobile version