| पनवेल | वार्ताहर |
टास्क पूर्ण करण्यास सांगून व पैसे मिळण्याचे आमिष दाखवत 5 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषिकेश उपाध्याय हे कामोठे सेक्टर-20 येथे राहतात. त्यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉइन करून 5 हजार रुपये गुंतवल्यास ७ हजार रुपये मिळतील, असे सांगण्यात आले. त्यावर त्यांनी ही रक्कम भरताच त्यांना टास्कवर 7 हजार रुपये आल्याचे दिसले असता, ते पैसे काढण्यास गेले असता, टास्क अर्धवट सोडून चालणार नाही, पुढचा टास्क पूर्ण करा, असे सांगत त्यांच्याकडून पाच टास्क पूर्ण करण्यासाठी एकूण 5 लाख 30 हजार रुपयांची रक्कम ट्रान्सफर करण्यास सांगितली. त्यानंतर त्यांना पैसे पाहिजे असतील तर 4 लाख भरा तरच पैसे मिळतील, अन्यथा ते पैसे कधीच मिळणार नाहीत, असे त्यांना सांगण्यात आले. या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कामोठे पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.




