गुगल पे वरून महिलेची फसवणूक

| माणगांव | प्रतिनिधी |

गुगल पे या यूपीआय अ‍ॅपवरून 99, 999 रु. फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (दि.6) सायंकाळी 6.44 वा. च्या सुमारास फिर्यादी पायल महादेव तांबे, व्यवसाय- सायबर कॅफेमध्ये नोकरी, रा. हातकेली, पो. होडगाव या कामावरून घरी जात  होत्या. त्यांच्या मोबाईलवर बँक ऑफ इंडिया शाखा माणगांव यांचे कडून बँक अकाऊंटमध्ये एकूण 2,25,000 रु. जमा रकमेपैकी 99,999 इतकी रक्कम पायल तांबे यांच्या गुगल पे अकाउंट नंबर वरून दुसर्‍या यूपीआय आयडी वर जमा झाल्याचा मॅसेज आला. त्यावेळी पायल तांबे यांची खात्री झाली की, गुगल पे कस्टमर मोबाईल क्र. 7478275674 यांनी विश्‍वास संपादन करून त्यांची फसवणूक केली आहे. या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाणे येथे भादवि कलम 420 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 चे कलम 66 (क) प्रमाणे करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील करीत आहेत.

Exit mobile version