महिलेला बोलण्यात गुंतवून फसवणूक

। नवीन पनवेल | वृत्‍तसंस्था |

दोन अनोळखी इस्मानी मोफत रेशन मिळत असल्याचे सांगून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि पाकीट लंपास केल्याची घटना कामोठे येथे घडली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेखा पवार या साई शरण कामोठे येथे राहत असून मंगळवारी (दि. 20) त्या बँक ऑफ इंडियामधून काम संपून घरी जात असताना दोन अनोळखी ईसम जवळ आले व गरीब लोकांना मोफत रेशन मिळत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी गळ्यातील मंगळसूत्र काढण्यास सांगितले व बोलण्यात गुंतवून मोफत रेशन मिळणार नाही असे सांगितले. त्यांनी मंगळसूत्र जवळ असलेल्या पाकिटात टाकले व पाकीट पिशवीत ठेवले. यावेळी चप्पल देखील काढून पिशवीमध्ये ठेवण्यास सांगितली. यावेळी बुद्ध विहार जवळ बसण्यास सांगून रेशन घेऊन येतो असे सांगितले. बर्‍याच वेळ त्या बसल्या. मात्र कोणीही आले नाही. दोघांनी बोलण्यात गुंतवून मंगळसूत्र आणि पाकीट घेऊन ते पळून गेले

Exit mobile version