नोकरीच्या आमिषातून तरूणाची फसवणूक

। पेण । वार्ताहर ।
लॉकडाउनच्या पाश्‍वर्र्भूमीवर अनेक तरूणांचे काम धंदे गेले आहेत. त्याचाच फायदा घेउन फेसबुक, इन्टांग्राम, यासारख्या सोशल मिडीयावर कामासंदर्भात फेक जाहिराती करून काम देतो या नावाखाली अनेक तरूणांची फसवणूक होत असल्याचे उघडकीस येत असतानाच असाच काहिसा प्रकार पेणमध्ये घडला आहे. वेदांत विजयकुमार पाटील रा.काश्मिरे, ता.पेण,जि.रायगड याने 10 डिसेंबर 2021 रोजी तो मोबाइल वर फेसबुक बघत असताना महेंद्रा कंपनीत जॉब असल्याचे त्याला एका जाहिरातीमध्ये दिसले. त्या जाहिरातीमध्ये असलेल्या क्रमांकावर त्याने कॉल केला. त्याला समोरून विचारण्यात आले की आपण काय शिकलात. त्यावर वेदांत पाटील यांनी सांगितले की, मी ऑटो मोबाईल इंजीनियर आहे. समोरील अनोळखी इस्माने विस हजार रूपये पगार असल्याची नोकरी देण्याचे कबुल केले आणि दोन दिवसात इंटरव्हूसाठी कॉल येईल असे ही सांगितले. त्या नंतर वेदांत कडून आधारकार्ड, पॅनकार्ड आणि बॅक पासबूक व्हॉटसप वर पाठवण्यास सांगितले. त्याच्या सांगण्या नुसार वेदांत यांने आधारकार्ड, पॅनकार्ड व बॅक पासबूक फोटो तसेच वडील विजयकुमार पाटील यांचे आधारकार्ड व पॅनकार्डचे फोटो पाठविले. तसेच त्याला नविन अकाउंट उघडण्यास अनोळखी व्यक्तीने सांगितले.


त्या नुसार वेदांत याने पेण अ‍ॅक्सिस बँकेत जाऊन नविन अकाउंट उघडले. व त्याचे पूर्ण डिटेल्स त्या अनोळखी व्यक्तीला दिले. त्यानंतर दि.28 डिसेंबर रोजी अ‍ॅक्सिस बँकेचे मॅनेजर सायंकाळी वेदांत याच्या घरी पोहोचले आणि विचारणा केली की, आपला व्यवसाय काय आहे कारण आपल्या बॅक खात्यातून मोठया प्रमाणात व्यवहार होत आहे. तेव्हा खरा प्रकार समोर आला आणि वेदांतची फसवणूक झाल्याचे समजले. त्या अनोळखी व्यक्तीने पेण, चेन्नई, व तामिळनाडू या ठिकाणावरून वेदांतच्या अकाउंट मधून ट्रानझेक्शन केलेले दिसून आले. एकंदरीत काय तर दिलेल्या कागद पत्रांचा दुरउपयोग करून त्या अनोळखी माणसाने वेदांत यांची फसवणूक केलेली आहे. याबाबत वेदांतचे वडील विजयकुमार पाटील यांनी पेण पोलिस ठाण्यात व जिल्हा पोलिस अधिक्षक अलिबाग रायगड यांच्या कडे लेखी स्वरूपात तक्रार केलेली आहे.

Exit mobile version