कॅम्पींग टेंट व्दारा फसवणूक; दोंघावर गुन्हा दाखल

| रेवदंडा | महेंद्र खैरे ||
कॅम्पींग टेंट व्दारा दिलेल्या आश्‍वासित सुविधा न पुरविल्याने महिला ग्राहकांनी रेवदंडा पोलिस ठाणे येथे फसवणूकीचा गुन्हा दाखल केल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक येथील महिला फिर्यादी यांनी रेवदंडा येथे 31 डिसेंबरची मौजमज्जा करण्यासाठी रेवदंडा समुद्र किनारी असलेल्या मुनलाईट कॅम्पींग व्यावसायीकांशी संपर्क करून बुकींग घेतले.

रेवदंडा येथे दि. 31 डिसेंबर रोजी मुनलाईट कॅम्पींग टेंट येथे आले असताना, तेथे त्यांना कॅम्पींग टेंट मालकांनी आश्‍वासीत केल्याप्रमाणे टेंट स्टे, जेवण, स्नॅक्स,डी.जे. पार्टी, लाईटिंग लाईट, म्युझीक बँड, फोटो, स्वच्छता, नाष्टा या सुविधा उपलब्ध केल्या नाहीत.महिला ग्राहकांला कॅम्पींग टेंट मालकानी आश्‍वासीत सुविधा न पुरविता रूपये 3 हजाराची फसवणूक केली, अशी तक्रार रेवदंडा पोलिस ठाणे येथे मुनलाईट कॅम्पींग टेंटच्या मालक व चालक यांचे विरोधात नोंदविली. रेवदंडा पोलिस ठाणे येथे महिला फिर्यादी यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार मुनलाईट कॅम्पींगच्या दोघाचे विरोधात भादविकलम 420,406,34 प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास रेवदंडा पोलिस ठाण्याचे इन्चार्ज पो.नि. देवीदास मुपडे हे करत आहेत.

Exit mobile version