चेक बाऊन्स प्रकरणः आरोपीला तीन महिन्यांची शिक्षा

| खोपोली | प्रतिनिधी |

खालापूर येथील मे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर सो यांच्या न्यायालयात फिर्यादी असलेले देवन्हावे गावातील गणेश नागे यांनी मेघा एम. कांबळे यांच्याविरोधात चेकची रक्कम न दिल्याबाबत तक्रार दाखल केली होती. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत सहदिवाणी कनिष्ठ न्यायाधीश पी.एम. माने यांच्या कोर्टात सुनावणी घेण्यात आली. यावेळी फिर्यादी गणेश नागे यांच्या वतीने ॲड. जयेश तावडे यांनी, तर आरोपीच्या वतीने ॲड. सत्यवान वाडेकर यांनी काम पाहिलं.

सदरचा खटला दाखल 2021 रोजी सुरु झाला होता, त्याचे अंतिम आदेश दि.11 रोजी निकाल फिर्यादीच्या बाजूने लागला असून, त्यामध्ये आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवून तीन महिन्यांचा कारावास व चेकची रक्कम व त्यावर 9 टक्के दराने व्याज आकारणीचे आदेश दिले आहेत.

Exit mobile version