| पेण | प्रतिनिधी |
सुहित जीवन ट्रस्ट पेण रायगड व नेने‘ज करा ओके स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने जल्लोष मराठी नूतन वर्षाचा 2023 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुहित जीवन ट्रस्ट या संस्थेने पूर्ण वर्षभराचा लेखाजोखा सांगितला. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन, दीपपूजन व गणेश वंदना करुन करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक रायगड अतुल झेंडे, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोल, अॅड. भूषण जंजिरकर सदस्य बाल न्याय मंडळ रायगड, अॅड. डॉ. नीता कदम, अॅड. मंगेश नेने आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रशालेच्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गुणगौरव करण्यात आला. तरी कार्यक्रमाला पाली उपनगराध्यक्ष अरीफ मनियार , नगरसेवक शोमेर पेणकर, नगरसेवक संतोष पाटील यांनी भेट दिली.
याप्रसंगी अतुल झेंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन मुलांना शुभेच्छा दिल्या. गुणगौरवाचा कार्यक्रम झाल्यानंतर नेने‘ज करा ओकेच्या गायकांनी आपल्या सूमधुर आवाजाने विद्यार्थी व पालकांचे मनोरंजन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेच्या मुख्याध्यापिका सुरेखा पाटील व त्यांच्या सहकार्यांनी विशेष मेहनत घेतली.







