रसायनी रेल्वे फाटक ठरतोय नागरिकांची डोकेदुखी

| रसायनी | वार्ताहर |

रसायनी रेल्वे स्टेशनजवळच कष्टकरी नगर, तुराडे ठाकूरवाडी, जूनी पोसरी गाव तसेच पोसरी ठाकूरवाडी ही गावे वसलेली आहेत. येथील कष्टकरी नागरिक आपल्या उपजीविकेसाठी रसायनीतील पाताळगंगा परिसरातील कारखान्यात कामधंदासाठी जातात परंतु सकाळ किंवा संध्याकाळी नोकरीच्या ठिकाणी जाताना रेल्वे स्टेशन पलीकडील गावातील नागरिकांना कामाला जायच्या वेळेवर रसायनीतील रेल्वे स्टेशन फाटक त्यांच्या पोटापाण्याच्या नोकरीवर मारक ठरतोय, कारण फाटक पडल्याने रेल्वे फाटकावर कधी-कधी अर्ध्या तासाच्या आसपास नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते.

रेल्वे प्रशासनाने काही कालावधी पूर्वी नागरिकांच्या सुव्यवस्थेसाठी भुयारी मार्ग स्वरूपात उजव्या बाजूने मार्ग काढला, परंतु दोन-तीन महिन्यांचा कालावधी सोडला तर या मार्गाचा नागरिकांना काहीएक उपयोग झाला नाही व रेल्वे प्रशासनाने काढलेल्या अंडरग्राउंड भुयारी मार्गावर खर्च केलेले लाखो रूपये पाण्यात गेले व त्यातून नागरिकांची नित्याचीच गैरसोय होवून नोकरीच्या ठिकाणी वेळेवर न जाता येत असल्यामुळे नोकरीवर टांगती तलवार आली आहे. याची रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन या भागातील नागरिकांची समस्या सोडवावी आशी या भागातील नागरिकांची रास्त मागणी आहे.

Exit mobile version