वाहतूक तीन तास ठप्प
| महाड | प्रतिनिधी |
दासगाव गावाच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास महाड एमआयडीसीमधून केमिकल घेऊन येणारा टँकर अचानक पलटी झाला. या अपघातामुळे महामार्ग तीन तास ठप्प झाला होता. ववाहतूक पोलीस आणि महाड शहर पोलीस घटनास्थळी आल्यानंतर रस्त्यावरून टँकर बाजूला काढण्यात आला. लुपिन लिमिटेड , तारापूर एमआयडीसीमधून महाड एमआयडीसी मधील जेट प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यासाठी स्पेनट ऑरगॅनिक सोलव्हेन्ट घेऊन येणारा टँकर (एम एच 04 बी जी -813 0 हा एका वळणावर महामार्गावर पलटी झाला.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड पो.उप नी. प्रवीण धडे, सहा.फौ.गणेश भिलारे,पो.हव.नंदन निजामपूर कर, अजय मोहित, सुनील पाटील,आणि महाड शहर पोलीस यांनी घटनास्थळी घेतली.घटनेचे गांभीर्य पाहता महामार्गावरील वाहतूक त्वरित बंद करण्यात आली. महाड एमआयडीसी अग्निशमन दल तसेच सेफ्टीचे मार्क कॉर्डिनेटर चंद्रकांत देशमुख, शीतल पाटील,रोहन पाटील यांना पाचारण करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेत भरलेला टँकर सुरक्षित बाजूला करण्यात आला. त्यानंतर सुमारे तीन तासाने वाहतूक सुरळीत करण्यात आली. सुदैवाने अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.