। चिपळूण । वार्ताहर ।
तालुक्यातील कामथे घाटात केमिकल टँकरला आग लागल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. गोव्याच्या दिशेने जात असलेल्या आयशरने अचानक पेट घेतला. पेटता आयशर पुढे जात असताना इतर वाहन चालकांनी त्या ड्रायव्हरच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली. ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत आयशर थांबवला. क्षणार्धात आयशरने पेट घेऊन तो पूर्णपणे जळून खाक झाला. मात्र यामुळे काहीकाळ महामार्गावर वाहतूक विकस्ळीत झाली असून प्रशासनाच्या कार्यतत्परतेमुळे ती पूर्वपरावर आली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नाही.