रसायनीतील विद्यार्थी बेपत्ता

| रसायनी | वार्ताहर |
रसायनीतील दुर्गामाता कॉलनी परिसरात राहणारा अकरावी वर्गातील विद्यार्थी पनवेल येथे क्लासला असे सांगून गेला तो अद्याप घरीच परतला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. जयेश संजय मोरे (वय 16) असे त्याचे नाव आहे. त्याच्या अज्ञात पणाचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात इसमाने त्यास फुस लावून पळवून नेले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.याबाबत रसायनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे.

Exit mobile version