। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ग्राम पंचायत चेंढरेचे आज पासून लसीकरण केंद्र चालू झाले. लसीकरणाचे पहिले लाभार्थी म्हणून माजी सरपंच संदीप ढवळे यांच्या पासून सुरवात झाली, लसीकरण सुभारंभासाठी जि प माजी सदस्य संजय पाटील, जि प सदस्या प्रियदर्शनी संजय पाटील, सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच-यतीन घरत, पंचायत समिती उप सभापती मिनल अजित माळी, परेश देशमुख, प्रशांत फुलगावकर, ग्राम विकास अधीकारी निलेश गावंड, पोलिस पाटील विकास पाटील ग्रा प सदस्यरोहन पाटील, स्मिता ढवळे, ममता मानकर, अनिता शेंडे, मिलिंद पाटील, प्रणिता म्हात्रे, लीना आंबेतकर, अस्मिता म्हात्रे, मीना नाईक, शुभांगी महाडिक, डॉ. राजाराम हुलवान, डॉ गणेश गवळी ,डॉ मिलिंद पाटील, डॉ सचिन घरत, श्री संदीप वारगे व नागेश्वरी हेमाडे, प्रल्हाद म्हात्रे, मिथुन बेलोस्कर, संतोष पालकर आरोग्य सेवक राठोड हे उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या वतीने लसीकरणासाठी नोंदणी करणार्या ग्रामस्थांना संदेश पाठवून लसीकरणासाठी त्यांना आगावू वेळ देण्यात येत असल्याने लसीकरण केंद्रावर जास्त गर्दी होत नाही. तसेच ग्रामस्थांना देखील वाट पहात बसावे लागत नसल्याने सर्व नियमांचे पालन देखील केले जात असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.