| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सहकाऱ्याने जी.एच. रायसोनी स्मृती चषक बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि.6 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता अलिबाग-चेंढरे येथील भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 13 वर्षांखालील गट (जन्मतारीख 1 जानेवारी 2013 नंतर), 17 वर्षांखालील गट (जन्मतारीख 1 जानेवारी 2009 नंतर) आणि खुला गट यांमध्ये रॅपिड पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेत विजेत्यांना रोख रक्कम आकर्षक चषक आणि पदक देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे चंद्रशेखर पाटील-932650 4179, सुशील गुरव 9822774278 आणि आविष्कार मरभळ 9657186778 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विलास म्हात्रे यांनी केले आहे.
अलिबागमध्ये बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
