| अलिबाग | शहर प्रतिनिधी |
रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित स्वर्गीय सुभद्रा अनंत पाटील स्मृती चषक स्पर्धा रविवारी (दि.22) सकाळी साडेदहा वाजता अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी हॉल चेंढरे येथे पार पडणार आहे. या स्पर्धेत 11 वर्षा खालील, 13 वर्षा खालील, 17 वर्षा खालील गट आणि खुला गट असे चार गट असणार आहेत.
विजेत्या खेळाडूंना बक्षिस म्हणून चषक आणि रोख रक्कम देण्यात येणार आहे. या स्पर्धा स्विस पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत. प्रत्येक फेरीचा कालावधी पहिल्या खेळीपासून 20 मिनिटे अधिक 3 सेकंद असा असणार आहे. बक्षिसाची रक्कम विभागून दिली जाणार नाही. जास्त रकमेचे बक्षिस खेळाडूला दिले जाईल आणि ते एकच असणार आहे. फिडेच्या नियमांचे पालन केले जाणार आहे. तसेच, स्पर्धेच्या काही नियमांत बदल करण्याचा आणि उत्तेजनार्थ बक्षीस देण्याचा अधिकार आयोजकांना राहणार आहे. या स्पर्धेसाठी 20 जुनपर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी विलास म्हात्रे (8888011411) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
अलिबागमध्ये बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

Businessman suit with chess board game. Plan stratgy and tactic concept