पाभरे हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराजांची जयंती

पुस्तक प्रदर्शन, वृक्ष वाटपाने कार्यक्रम झाला रंगतदार

। म्हसळा । वार्ताहर ।

म्हसळा येथील केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय आणि श्री स्वामी विवेकानंद संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल पाभरे येथे छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन आणि उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.

छत्रपती शाहू महाराज ही अशी व्यक्ती होती की, ज्यांनी राजा असूनही दीन-दलित आणि शोषित वर्गाचे दुःख समजून त्यांच्याशी सदैव जवळीक ठेवली असल्याचे मान्यवरांनी स्पष्ट केले. राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जुन 1874 रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांची राणी आनंदीबाई यांनी 18 मार्च 1884 रोजी त्यांना दत्तक घेतले व ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज झाले. वाचनालयाने छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त भरविलेल्या पुस्तक प्रदर्शनांत राजर्षी शाहू गौरव ग्रंथ, छत्रपती शाहू स्मृति दर्शन, राजर्षी शाहू छत्रपतींचे जाहीरनामे व हुकूम नामें, शाहू, शिक्षण महर्षी राजर्षी शाहू महाराज, राजर्षी शाहू कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे, शाहू छत्रपती आणि लोकमान्य टिळक एक शोध, राजर्षी शाहू छत्रपतींची भाषणे, यांनी महाराष्ट्र घडविला अशी विविध ग्रंथसंपदा आयोजकानी प्रदर्शनात ठेवली होती. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, तालुका हिंदू समाजाचे अध्यक्ष महादेव पाटील, वैष्णवी कळबसकर, रेणूका पाटील, दिपाली पालवे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र ढंगारे, पर्यवेक्षक नरेश जामकर, सुजय कुसळकर, कृषी सहाय्यक अशोक सानप, अंगणवाडी सेविका कमला दिघीकर, सुनंदा आंबेतकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version