जेएसएममध्ये छत्रपतींचा जन्मोत्सव

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जे. एस. एम. महाविद्यालयात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्या डॉ. सोनाली पाटील,एनएनएसचे डॉ. प्रविण गायकवाड, डॉ. मीनल पाटील, डॉ. सुनील प्रा. ए. व्ही. जाधव, डॉ. सदाशिव कानडे, प्रा. गौरी लोणकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. सीमंतिनी ठाकूर व एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते.

अ‍ॅड. गौतम पाटील व प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक व स्वयंसेवकानी आणलेल्या सात गडावरील पाण्याने आभिषेक घालण्यात आला. त्यानंतर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले. गौतम पाटील यांनी सर्वांना शिवजयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या आचरणात आणावेत असे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रेक्षणी घरत यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. प्रविण गायकवाड यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, डॉ. पाटील व डॉ. सुनील आनंद आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनी केले.

Exit mobile version