। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना एका भयानक प्रसंगाला सामोरं जावं लागले. बुधवारी रात्री राजीव कुमार यांना घेऊन जाणार हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे तात्काळ जमिनीवर उतरवण्यात आले. पण ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरलं ते ठिकाणी खुपच भयावह असल्याचे समोर आले आहे. राजीव कुमार यांचं हेलिकॉप्टर उत्तराखंडमधल्या सुदूरवर्ती गावात उतरवण्यात आले. निर्मनुष्य असलेल्या या गावातलं वातावरण शून्य डिग्री इतकं होते. याच परिस्थितीत राजीव कुमार यांना तब्बल 16 तास काढावे लागले. कुमार यांच्याबरोबर दोन पायलट, दोन निवडणूक अधिकारी हे देखील होते. या सर्वांना सुदूरवर्ती गावातील एका निर्जन घरात रात्र काढावी लागली.
राजीव कुमार हे पिथौरगढ इथल्या एका मतदान केंद्राची पाहणी दौरा करणार होते. डोंगरावरच्या आणि अडगळीच्या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्र आणि मतदारांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागते, याची माहिती निवडणुक आयोगाला घ्यायची होती. यासाठी उत्तरांखडमधल्या 14 गावांतील मतदान केंद्राचा दौरा करण्याची योजना आखण्यात आली होती. पण खराब हवामानामुळे त्यांचं हेलिकॉप्टर रालमजवळ आपत्कालीन परिस्थिती उतरवण्यात आलं. ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरलं त्या गावाचं नावं सुदूरवर्ती असं होतं. हे गाव उंच डोंगरावर असून इथलं तापमान शून्य डिग्री सेल्सिअस इतकं असते. गुरुवारी सकाळी सीईसी राजीव कुमार यांना सुरक्षित रेस्न्यू करण्यात आलं. हवामान चांगल्यानंतर हेलिकॉप्टरनेही उड्डाण घेतलं आणि मुनस्यारी तहसील मुख्यालयाच्या ठिकाणी पोहोचलं.