पीएनपी शाळा पाष्टीचा तिसरा क्रमांक
| म्हसळा | वार्ताहर |
महाराष्ट्र राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विदयार्थी व माजी विदयार्थी यांच्या शाळे प्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्या योगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर गेल्या पंचेचाळीस दिवस चालू होते.
सदर अभियानात रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील नियोजित तालुकास्तर मूल्यमापन समितीने – प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी ची माध्यमिक शाळा पाष्टीफ या शाळेची प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. मूल्यांकन निकषानुसार शाळेने केलेली सजावट, परिसर स्वच्छता, सुंदरता व नीटनेटकेपणा व शिस्त तसेच विद्यार्थी मंत्रीमंडळ कामकाज, विद्यार्थी बचत बँक, प्रधानमंत्री पोषण शक्ती योजने अंतर्गत निर्माण केलेली परसबाग व त्यांनी सहभाग घेतलेल्या महा वाचन चळवळ, मेरी माटी मेरा देश, स्वच्छता मॉनिटर अभियान-टप्पा 2 अणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडीत व्याख्याने, मासिक पाळी व्यवस्थापन, स्पर्श ज्ञान व प्रात्यक्षिके व शाळेने सामाजिक क्षेत्रात काम केलेल्या आर्थिक साक्षरता, राष्ट्रीय एकात्मता, शैक्षणिक उठाव, नव साक्षरता अभियान या सर्व बाबीं ची पाहणी व तपासून पडताळणी केली .
सदर तपासणी अंती तालुक्यातील एकूण वीस शाळांमध्ये पी.एन.पी. माध्यमिक शाळा ही दुर्गम व ग्रामीण व डोंगराळ भागात असून व अंशतः अनुदानित असून सुद्धा शाळेतील सर्व कर्मचारी वर्ग, संस्था व शाळा व्यवस्थापन समिती, दानशूर व्यक्ती, व सेवाभावी संस्था (सुर्योदय फाऊंडेशन व स्वदेस फाऊंडेशन) तसेच पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ मंडळ व माजी विद्यार्थी यांच्या सहकार्याने – मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात – म्हसळा तालुक्यात मतृतीय क्रमांकास मपात्र ठरली आहे.
सदर यशाबदल प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह सौ चित्रलेखा नृपाल पाटील व संस्था पदाधिकारी व शाळा समिती पाष्टी चे अध्यक्ष – राजाराम धुमाळ व पदाधिकारी, गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड व केंद्रप्रमुख नरेश सावंत व शाळेचे प्रमुख डोनर कृष्णा महाडिक यांनी शाळेचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच विविध माध्यमातून व क्षेत्रातून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सदर अभियान यशस्वी पणे राबवून यशस्वी होण्याकरीता शाळेचे मुख्याध्यापक सुदाम माळी यांच्या नियोजन व प्रेरणेतून शाळेतील शिक्षक प्रफुल्ल पाटील , बिलाल शिकलगार, ललित पाटील, विनयकुमार सोनवणे ,शिक्षकेतर कर्मचारी संदिप दिवेकर, प्रशांत जोशी, दर्शनाताई दिवेकर व विद्यार्थी यांनी अहोरात्र अथक मेहनत घेतली.






