माथेरान प्राथमिक शाळा प्रथम
। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान नगरपरिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात प्रथम क्रमांक पटकावला असून तालुक्यातील एकूण 297 शाळांनी या अभियानात सहभाग नोंदवला होता.
स्वच्छता, शिस्तबद्ध वागणूक, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि शाळेच्या गुणवत्तेच्या आधारावर माथेरानच्या प्राथमिक शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला असून तीन लाख रुपयांच्या बक्षीसाची मानकरी ठरली आहे. याकामी शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षा ज्योती शिंदे, मुख्याध्यापक दिलीप आहिरे, शिक्षक सचिन भोईर, अनिश पाटील, संतोष चाटसे, साक्षी कदम, निकिता चव्हाण, मनिषा चौधरी , किरण शिंदे, नगरपरिषदेच्या अभियंत्या करुणा बांगर, लेखापाल अंकुश इचके आदींचे विशेष सहकार्य लाभले.