‘फोडा काय बॉम्ब फोडायचे, पण… ‘

मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला
मुंबई | प्रतिनिधी |
ड्रग्ज,समीर वानखेडे प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैर्‍या झडू लागल्या आहेत. त्यावरुन आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फोडा काय बॉम्ब फोडायचे आहेत ते असा उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याचं वक्तव्य केलं. त्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, मफकाहीजण बॉम्ब फोडणार आहे, असं समजतं. फोडा काय बॉम्ब फोडायचे आहेत. पण, पाकिस्तानात कधी बॉम्ब फोडणार ते सांगा आधी? मी त्याची वाट बघतोय. दिवाळीला राजकीय फटाक्यांची गरज नाही.फफअशी टीका त्यांनी केली आहे.
मंत्री नवाब मलिकांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर ड्रग्सप्रकरणी गंभीर आरोप केले होते.ॉत्यानंतर मलिकांनी लवंगी फटाके फोडले, आम्ही दिवाळीनंतर बॉम्ब फोडू, असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिले होते.

Exit mobile version