| नागपूर | वृत्तसंस्था |
हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. राज्याची संस्कृती इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे. इथे सर्व जातीपातींचे लोक सोबत राहतात, काम करतात आणि सण साजरे करतात. सर्वजण आनंदाने राहतात. त्यामुळे राज्यात जातीय सलोखा, कायदा व्यवस्था बिघडू नये, असा आमचा प्रयत्न राहतो. सर्व समाजाचे मत घेतल्यानंतर सर्व समाजाचे हित लक्षात घेऊन जातीय जनगणणेसाठी जो योग्य निर्णय असेल तो घेतला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयात डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीभवनाला बुधवारी भेट दिली. यावेळी जातीनिहाय जनगणनेला संघाकडून होत असलेल्या विरोधबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. हिवाळी अधिवेशनात, जेव्हा अधिवेशन नागपुरात असतं तेव्हा आम्ही सरसंघचालक हेडगेवार स्मारक समितीला भेट देत असतो आणि हेडगेवारांचं श्रद्धेने दर्शन घेतो. इथं आल्यानंतर उर्जा आणि प्रेरणा मिळते त्यासाठी आम्ही इथं येतो, असे शिंदे म्हणाले.