| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरिता महाराष्ट्र शासन निर्णयान्वये महसूल विभागामार्फत राज्यात 1 ऑगस्टपासून महसूल पंधरवडा-2024 साजरा करण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने तहसील कार्यालय मुरुडतर्फे दि. 2 ऑगस्ट रोजी मुरुड येथील अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीबाबत शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये मुरुड तहसीलदार रोहन शिंदे यांनी विद्यार्थ्यांना या योजनेची विस्तृत माहिती दिली आणि शंकांचे निरसनही केले. तसेच विद्यार्थ्यांना लागणार्या विविध दाखल्यांचे अर्ज दाखल करून घेऊन दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
या शिबिरामध्ये नायब तहसीलदार संजय तवर, मंडळ अधिकारी खुशाल राठोड तसेच तलाठी रुपेश रेवसकर, रेश्मा विरकुड, सपना वायडे, पूजा विरकुड व राहुल जाधव आणि महाविद्यालयाचे प्रा. अल्ताफ फकीर, प्रा. जावेद खान मणियार, प्रा. निदा गोरमे, प्रा. सानिका लोटणकर आदींनी शिबीर आयोजनासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
तहसील कार्यालयातर्फे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण शिबीर
