अॅड. मनोजकुमार शिंदे विजयी
| नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्याजवळील मुरावाडी येथील जय बजरंग क्रिकेट क्लब मुरावाडी यांच्या सहकार्याने तसेच आयोजक व प्रवीण ताडकर यांच्या वतीने मुरावाडी येथील मैदानावर संपन्न झालेल्या मुख्यमंत्री चषक क्रिकेट स्पर्धेत अॅड. मनोजकुमार शिंदे, रोहा हा संघ विजयी झाला. या संघाला 1 लाख रूपयांचे पारितोषिक व मुख्यमंत्री चषक देऊन गौरविण्यात आले. तर वाय.जी.एस. वरवठणे संघ 50 हजारांचे पारितोषिक व चषकासह उपविजेता ठरला. तसेच हाशिवरे संघाने तृतीय क्रमांकाचे 25 हजार रुपये व चषक पटकावला.
या स्पर्धेत रोहा संघाचा जिवित म्हात्रे या खेळाडूला मालिकावीर व अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. वरवठणे संघाचा ऋतिक माळी याला उत्कृष्ट फलदांज तर हाशिवरे संघाचा मनिष याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले. या भव्य क्रिकेट स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल प्रवीण ताडकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास प्रवीण ताडकर, किशोर म्हात्रे, गणपत म्हात्रे, किसन बोरकर, विक्रांत घासे, आकाश मढवी, विजय पाटील, सुधीर पारंगे, गंगाराम पारंगे, रमेश पारंगे, दिपक सोनावणे, अजित दळवी, भरत गिजे, किसन मढवी, सतीश डाकी, चंद्रकांत ताडकर, सीताराम ताडकर, प्रमोद चोगले, अरुण चोगले, नामदेव ताडकर, गजानन ताडकर,चेतन ताडकर, सुरेश ताडकर, घनःशाम ताडकर, श्रिकांत ताडकर, अमोल ताडकर, सौ.ज्योती ताडकर, रूद्र ताडकर, ताडकर कुटुंबीय आदींसह मुरावाडीतील ग्रामस्थ व क्रिकेटप्रेमी नागरिक यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.