। ठाणे । प्रतिनिधी ।
भाईंदर पूर्वीच्या काशीनगर येथील देवदर्शन अपार्टमेंटमध्ये राहणार्या महेश पिरदानकर यांचा अडीच वर्षाचा मुलगा नितेश डाळिंबाचे दाणे खात होता. दाणे खात असताना श्वास नलिकेत डाळिंबाचे दाणे अडकले. त्यामुळे त्या मुलाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि तो बेशुद्ध झाला होता. त्याला तात्काळ भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
डाळिंबाचे दाणे श्वासनलिकेत अडकून चिमुकल्याचा मृत्यू
