खरीवली आदिवासीवाडीतील दिड वर्षीय बाळाचा विषारी साप चावल्याने मृत्यू

माणगाव | सलीम शेख |

माणगाव तालुक्यातील खरीवलीआदिवासीवाडीतील दिड वर्षीय  बाळाचा विषारी साप चावल्याने मृत्यू झाला. सदरील घटना बुधवार दि.३ नोव्हेंबर रोजी घडली.या घटनेची खबर सुचीता किसन हिलम( वय-२३) रा.खरीवली आदिवासीवाडी ता.माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.  सदरील घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.   सदर घटनेनेबाबत माणगाव पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की घटनेतील मयत बाळ साहिल किसन हिलम (वय-१ वर्षे ६ महिने) यास कोणतातरी विषारी साप चावल्याने त्यास औषधोपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दाखल केले असता तेथील डाँक्टरांनी त्यास तपासून तो मयत झाले असल्याचे घोषित केले. या घटनेची नोंद माणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात म्रुत्यु रजि.नं.४१/२०२१ सीआरपीसी १७४ प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार श्री. दोडकुलकर हे करीत आहेत.

Exit mobile version