आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड नगरपरिषद शाळा क्रमांक एक मध्ये बालक पालक क्रीडा महोत्सव या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील कार्यक्रमास संजय गुंजाळ, पांडुरंग आरेकर, यशवंत सवाई, नंदकुमार आंबेतकर दिनेश भोईर, बाबुलाल पाखरे,आदी मान्यवर उपस्थित होते. बालक पालक क्रीडा महोत्सवात विविध संपन्न होणार्या खेळामध्ये मुलांबरोबर त्यांचे पालक सुद्धा सहभागी होत असतात.
पालक आल्याने मुलांमधला आत्मविश्वास द्विगुणित होऊन खूप चांगल्या पद्धतीने मुलांनी विविध खेळात आपले कौशल्य दाखवले. सदरच्या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुरुड तालुका अध्यक्ष संजय गुंजाळ यांनी दहा हजार रुपये आर्थिक सहकार्य केले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश ठाकूर, संध्या नागे, उत्कर्ष रणदिवे,कविता मकु, नीलिमा आगलावे, प्रवीणा भोईनकर, रुपन फळेभाई, आदी मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले.