बाल संस्कार शिबीर उत्साहात

सुशील वाघमारे यांच्या हस्ते उद्घाटन

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा जिल्हा रायगड उत्तर अंतर्गत शाखा व श्रमण बुद्ध विहार कमिटी तसेच क्रांतीनगर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने बालसंस्कार शिबिराचे आयोजन रविवारी (दि.18) करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे यांच्या हस्त करण्यात आले. पेण येथील श्रमण बुद्ध विहार क्रांतीनगर येथे झालेल्या या शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

पेण तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली 5 दिवसीय बाल संस्कार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन रायगड जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रकाश सोनावणे, जिल्हा संस्कार उपाध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक संतोष जाधव, जिल्हा संघटक सिद्धार्थ गायकवाड आदी मान्यवर जिल्ह्यातील पदाधिकारी, तालुका पदाधिकारी व शिबीरार्थी उपस्थित होते. या बाल संस्कार शिबिराला बालकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. या शिबिराचे मुख्य मार्गदर्शक संतोष जाधव यांनी शिबिरार्थीना सखोल मार्गदर्शन करीत बावीस प्रतिज्ञा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपणाची माहिती दिली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे यांनी आपल्या मार्गदर्शनात बाळ शिबिराचे महत्व व संस्थेच्या 24 शिबिरांची माहिती समजावून सांगितली. जिल्हा सरचिटणीस प्रकाश सोनावणे यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत सोनावणे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, येणाऱ्या काळात पेण तालुक्यात संस्थेच्या माध्यमातून शिबीरे मोठ्या प्रमाणात राबविण्याचे मानस असल्याचे सांगितले. यावेळी पेण तालुका कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी श्रमण बुद्ध विहार कमेटी, महिला पदाधिकारी व क्रांती नगर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस सचिन कांबळे यांनी केले. या शिबीराच्या माध्यमातून बौद्ध धम्माबरोबरच, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या बाबत मोलाचे मार्गदर्शन मान्यवरांनी करीत बालकांमध्ये चांगले संस्कार निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

Exit mobile version