| रसायनी | प्रतिनिधी |
खालापूरमधील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचे बालदिनाच्या निमित्ताने शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी औक्षण केले. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त शाळेतील विद्यार्थी विविध वेशभूषा करून शाळेत आले होते. चाचा नेहरू, चित्रपटातील पुष्पा, वारकरी, स्पायडरमॅन तर कुणी कोळीण अशा विविध वेशभूषा करून शाळेत आले होते. तसेच, विविध नृत्याने बालदिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे, गाणी व काही मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, स्वयंसेवक, अंगणवाडी सेविका आदींसह पालक उपस्थित होते.







