| उरण | प्रतिनिधी |
पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून यू.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्समधील पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व ज्यु. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी विविधरंगी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी कविता पठण, कथा सांगणे, एकल गायन, चित्रकला, निबंधलेखनव फॅन्सी ड्रेस ह्या स्पर्धा होत्या तर माध्यमिक विभागाच्या विदयार्थ्यांसाठी क्विझ, मास्क मेंकिंग, बेस्ट आऊट ऑफवेस्ट, फॅन्सी ड्रेस आणि यू. ई. एस. गॉट टॅलेंट स्पर्धा तर ज्यु. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एक्सटेम्पोर, क्विझ, रांगोळी, टीशर्ट पेंटिंग, डोअर मॅट मेकिंग व मेहंदी इत्यादी स्पर्धा तर सांस्कृतिक कार्यक्रमात गायन, नृत्य व बॉलीवूडमधील प्रतिष्ठित कलाकारांचा अभिनय करणे इत्यादी विविध कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले.
विद्यार्थ्यांनी या सर्व स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेऊन स्पर्धा रंगारंग व रंगतदार केली. म्हणूनच यु.ई.एस. संस्थेच्या सर्व कमिटी मेंबर्स, स्कूल ॲण्ड ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या, समन्वयक तसेच माध्यमिक, प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागातील पर्यवेक्षिका आणि शिक्षकांनी विद्ययार्थ्यांच्या कलागुणांना व प्रयत्नांना मनापासून दाद दिली व कौतुकही केले.







