| अलिबाग | वार्ताहर |
अलिबागमधील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणारी किड्सझी प्री प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम राबवून दीपावली सण मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये शिक्षकांच्या मदतीने रंगीबेरंगी कंदील बनविण्यात आले, तसेच विविध आकाराच्या पणत्या रंगवून सजविण्यात आल्या, चिमुकल्या हातांनी रांगोळ्या काढण्यात आल्या व चौदा वर्षे वनवास भोगून आपली पत्नी सीता व भाऊ लक्ष्मण यांच्यासमवेत अयोध्येत परतनाचा प्रभू रामचंद्रांचा देखावा वेशभूषा करून साकारण्यात आला, हे दृश्य कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. अभ्यासक्रमासोबत भारतातील सण उत्सवांविषयी माहिती विद्यार्थ्यांना मिळावी तसेच दीपावलीसारख्या महत्त्वाच्या सणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे यासाठी असे विविध उपक्रम शाळेत राबवित असल्याचे शाळेच्या सेंटर मॅनेजर सीमा शेडगे यांनी सांगितले.