| वाशिम | वृत्तसंस्था |
मनोज गेडाम नावाच्या व्यक्तीने उमेदवारी अर्ज भरताना 12 हजार 500 रुपयाची चिल्लर निवडणूक आयोगाला नामनिर्देशन पत्रासोबत जमा केली आहे. ही रक्कम मोजत असताना कर्मचार्यांची चांगलीच दमछाक झाली. यवतमाळ वाशिम लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना अपक्ष उमेदवार मनोज गेडाम यांनी 12 हजार 500 रूपये चिल्लर स्वरूपात निवडणूक विभागाकडे जमा केले. त्यामुळे प्रशासनाच्या कर्मचार्यांच्या नाकीनऊ आले. सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित असलेल्या मनोज गेडाम यांनी लोकं गुरुदेव या टोपण नावाने ओळखतात. मी गोर गरीब जनतेची अनेक वर्ष सेवा करत आलो आहे आणि त्यांनीच मला या निवडणुकीत उभे राहण्यासाठी एक, दोन, पाच आणि दहा रुपये अशी रक्कम जमा करून दिली आहे. त्यामुळेच सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मी ही लोकसभा निवडणूक मी जिंकणार असे त्यांनी सांगितले आहे. जनतेने दिलेली रक्कम मी इथे जमा करण्यास घेऊन आलो आहे असं मनोज गेडाम यांनी सांगितला आहे.