भारताचा प्रथम क्रमांकाचा शत्रू चीनच

बिपीन रावत यांचे प्रतिपादन
भविष्यकालीन संभाव्य धोक्यासंदर्भात भाष्य
सैन्याच्या भूमिकेबाबतही दिली माहिती
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय सैन्यदलाचे संरक्षण प्रमुख बिपिन रावत यांनी, पाकिस्तान हा भारताचा अग्रगणी शत्रू नसून, भारताचा प्रथम क्रमाकांचा शत्रू चीनच असल्याचे प्रतिपादन केले आहे. देश आणि परराष्ट्र संबंध याविषयी प्रसारमाध्यमांसह संवाद साधताना, त्यांनी हे भाष्य केले आहे.
महासत्ताक होऊ पाहणारा भारत स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीतही पाकिस्तान आणि चीन या राष्ट्रांच्या गैरआवाहनांचा सामना करीत आहे. एकीकडे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद तर दुसरीकडे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ म्हणजेच एलएसीजवळ चीनच्या कुरघोड्या या घटना सातत्याने होत आहेत. त्यातही महामारीच्या काळात भारत-चीन सीमेवर सातत्याने विविध घटना घडत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर बिपीन रावत प्रसारमाध्यमांनासमोर व्यक्त झाले आहेत.
बिपीन रावत म्हणाले की, गलवान खोर्‍यातील संघर्षानंतर भारत आणि चीनचे सैन्य अनेकदा एकमेकांसमोर उभे ठाकले होते. सैनिकांनी एवढ्या जवळ येऊन संघर्ष होऊ नये यासाठी दोन्ही देश प्रयत्न करत आहेत. 2020 एप्रिलच्या पूर्वी जी परिस्थिती होती ती निर्माण करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असल्याचे रावत म्हणाले आहेत.
रावत म्हणाले की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या परिसरामध्ये डी-अ‍ॅक्सलरेशन करण्याऐवजी विघटन करणे, हे आमचे उद्देश आहे. भविष्यात एकाचवेळी भारताला पाकिस्तान आणि चीन अशा दोन्ही आघाड्यांवर शत्रूंना तोंड द्यावे लागू शकते, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.
याशिवाय, अरुणाचलच्या सीमेजवळ चीनने गाव वसवले असल्याच्या बातम्यांसंदर्भातही रावत यांनी भाष्य करताना चीनच्या लष्कराने आधीचे बांधकाम पाडून नवीन बांधकाम उभारल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. चीन त्यांच्या बाजूच्या सीमा भागामध्ये विकासकामे करत आहे. आजच्या जामान्यामध्ये लोकांना उपग्रह किंवा गुगलच्या माध्यमातून फोटो मिळतात. यापूर्वी अशापद्धतीचे तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. असाच एखादा फोटो समोर आल्यानंतर घुसखोरी आणि ताबा मिळवल्याच्या चर्चा होतात, असे ते म्हणाले.
तर, चीन त्यांच्या सीमा भागांमध्ये विकास करत आहे त्याचप्रमाणे भारतही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या भागामध्ये मोठ्याप्रमाणात विकास कामे करत असल्याचे रावत म्हणालेत. पूर्वी आपण एसएसीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये रस्ते बांधत नव्हतो. चिनी सैनिक येऊन रस्ते तोडतील, त्यांचे नुकसान करतील अशी भीती होती. मात्र आता तसे वातावरण राहिले नसल्याचा दावाही रावत यांनी केला आहे.

Exit mobile version